अहमदनगर बातम्या

शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-   कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील तरुणाने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

रवींद्र एकनाथ होन (वय 30) असे या तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. तर याप्रकरणी सतीश एकनाथ होन यांनी फिर्याद दिली असून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, चांदेकसारे-सोनेवाडी गोरक्षनाथ रोड लगत होन यांची वस्ती व शेती आहे. सकाळी सतिश होन हे आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेले असता त्यांना आपल्या शेतात लिंबाच्या झाडाला रवींद्र एकनाथ होन यांचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळून आला.

याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी दाखल झाले. मयत झालेल्या रवींद्र होन यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

शवविच्छेदन केल्यानंतर होन यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात चांदेकसारे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक आंधळे व श्री. कुसारे पुढील तपास करीत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts