अहमदनगर बातम्या

एसटी बसच्या संपामुळे अवघ्या 60 दिवसात 35 कोटींचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे.यातच नगर जिल्ह्यात देखील एसटी संप सुरु आहे.

दरम्यान नगर जिल्ह्यात या दोन महिन्यांच्या संप काळात महामंडळाच्या अहमदनगर कार्यालयाचे सुमारे 35 कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आजही संप सुरूच आहे.

आजही या संपात जिल्ह्यातील दोन हजार 514 कर्मचारी सहभागी आहेत. त्यातील 290 जणांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, अशी माहिती एसटी महामंडळ अहमदनगरच्या विभागीय नियंत्रक कार्यालयाकडून मिळाली.

जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, जामखेड, पाथर्डी हे आगार वगळता गेल्या आठ दिवसांपासून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या इतर आगारातून बसच्या काही प्रमाणात फेर्‍या सुरू झाल्याचा दावा अहमदनगर विभागीय नियंत्रक कार्यालयाने केला आहे.

तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आगारातून बसच्या दररोजच्या शंभरपेक्षा अधिक फेर्‍या होत आहेत. यातून दररोजचे सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे.

पण मिळत असलेले हे उत्पन्न नुकसान भरून काढणारे नाही. राज्य सरकारचे परिवहन मंत्रालय एसटी कर्मचार्‍यांनी संप मागे घेतला, असे कितीही सांगत असले तरी एसटीचे चाक संपामुळे रुतलेलेच आहे.

राज्यात अजूनही एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरूच दिसतो. अहमदनगर जिल्ह्यातही संपाची धग कायम आहे. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून एसटी कर्मचार्‍यांचे समाधान न झाल्याने अजून किती दिवस संप सुरू राहिले, हे आत्ताच सांगता येणार नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts