Ahmednagar News : तलवारीच्या धाकावर लुटणारे पाच आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून ५० हजारांची रक्कम जप्त केली.
सत्यवान दादा जाधव, गौरव महादेव नाळे,शुभम सुदाम क्षिरसागर (तिन्ही रा.अजनुज, ता.श्रीगोंदा), अरबाज बशीर सय्यद,
सलीम शब्बीर बेग (दोन्ही रा.आनंदवाडी, ता.श्रीगोंदा) अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर व श्रीगोंदा पोलीसांनी ही संयुक्त कारवाई केली.
अधिक माहिती अशी : ३० जानेवारी रोजी निलेश नामदेव जाधव (रा.काष्टी, ता.श्रीगोंदा) हे साथीदारासह टेम्पो घेऊन चालले होते. यावेळी सहा इसमांनी तलवारीचा धाक दाखवत मारहाण करत १ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.
याबाबत श्रीगोंदे पोलीस ठाण्यात दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत गुन्ह्याचा तपास करुन आरोपीना अटक करण्याचे सूचित केले होते.
यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिनांक ६ फेब्रुवारीला पथक तयार करून याबाबत शोध घेत होते.
श्रीगोंदा परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वरील आरोपींनी
हा गुन्हा केला आहे. त्यानुसार पोलिसांनी अजनुज गावात सापळा लावून आरोपी ताब्यात घेतले. गुन्ह्यातील गेलेल्या मालापैकी ५० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले.