अहमदनगर बातम्या

नगर जिल्ह्यातील ‘या’ प्रसिद्ध उद्योजकाच्या नावे मागितले ५० लाख ; मात्र फसवणुकीचा प्रयत्न फसला अन … ?

Ahmednagar News : अलीकडच्या काळात तंत्रज्ञाचा दुरुपयोग करत मी अमुक मंत्र्यांचा पीए बोलतोय अथवा कुणी मोठा डॉन बोलत असल्याचे भासवून मोठ्या रकमेची मागणी केल्याची अनेक उदाहरणे आपण दररोज पाहतो. असाच प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे.

एक भामट्याने आपण येथील प्रसिद्ध उद्योजक राजेश मालपाणी असल्याचे भासवत फोन वरून येथील कर्मचाऱ्यास तात्काळ ४९ लाख ६० हजार ५०३ रुपये पाठविण्यास सांगत फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या कर्मचाऱ्यास शंका आल्याने त्याने पैसे पाठवले नाही.

त्यामुळे मोठी फसवणुक टळली असून याबाबत राजेशप्रसाद दौलतप्रसाद दुबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि घटना बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडली.

नगर जिल्ह्यातील संगमनेरमधील राजेश मालपाणी हे मोठे उद्योजक आहेत. त्यामुळे भामट्याने त्यांच्या नावाने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. याबाबत
राजेशप्रसाद दौलतप्रसाद दुबे यांनी रात्री शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी साडेनऊ वाजता मालपाणी हाऊसमध्ये असताना अज्ञात व्यक्तीने एका मोबाईल क्रमांकावरून दुबे यांना फोन केला.

फोनवर आपण राजेश मालपाणी बोलत असल्याचे भासवत तात्काळ ४९ लाख ६० हजार ५०३ रुपये पाठविण्यास सांगितले. मात्र कर्मचाऱ्याला संशय आल्याने त्यांनी कोणतेही पैसे पाठविले नाही, त्यानंतर उद्योगपती मालपाणी यांच्या नावावर कोणीतरी आपली फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली.

याबाबत राजेशप्रसाद दौलतप्रसाद दुबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर पोलिसांनी १ जुलैपासून बदललेल्या भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts