Ahilyanagar News: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठीचे मतदान हे 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार असून या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे राज्यांमध्ये आता या विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण असून सगळ्यांना आता या निवडणुकीची उत्सुकता लागून राहिलेली आहे.
निवडणुकीमध्ये मतदान करणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य असून लोकशाहीसाठी मतदान ही एक आवश्यक प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे खूप महत्त्वाचे असते.
आपल्याला माहित आहे की, वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या कुठल्याही भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता येतो. परंतु त्याकरिता मतदार नोंदणी करणे गरजेचे असते.
अगदी याच प्रमाणे जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी नवीन मतदारांच्या संख्येमध्ये आता मोठ्या प्रमाणावर भर पडली असून या विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल 18 ते 19 वर्ष वयोगटातील 83 हजार 959 नव मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात नवीन मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ
अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभेचे 12 मतदारसंघ असून या बाराही मतदार संघांमध्ये एकूण 37 लाख 60 हजार 512 मतदार मतदानाचा हक्क या विधानसभा निवडणुकीत पार पडणार आहेत.
यामध्ये पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्याची उत्सुकता तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर असते. या विधानसभा मतदान प्रक्रियेमध्ये 18 ते 19 वयोगटातील अहिल्या नगर जिल्ह्यातील तब्बल 83 हजार 959 नवीन मतदारांची भर पडली असून ते या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
निवडणूक विभागाच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणीची प्रक्रिया 19 ऑक्टोबरला बंद करण्यात आली आहे. जर आपण नवीन मतदारांच्या दृष्टिकोनातून बघितले तर मतदानाची टक्केवारी नव मतदारांची जास्त असते. त्यामुळे या नवीन मतदारांच्या मतदानाचा निवडणूक प्रक्रियेवर खूप मोठा प्रभाव जाणवतो.
लोकसभा निवडणुकीच्या मध्ये नवीन मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले होते व तोच ट्रेंड या विधानसभा निवडणुकीत देखील हे नवीन मतदार ठेवतील अशी अपेक्षा केली जात आहे.
तसेच मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावे याकरिता आता मतदान केंद्रांची माहिती ऑनलाईन पाहता येणे शक्य झालेले आहे. इतकेच नाही तर मतदानासाठी आवश्यक असलेली मतदार ओळखपत्र हे ई- इपीआयसी हे नवीन डिजिटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करून सुरक्षित ठेवण्याची सुविधा मिळाली असल्याने मतदारांना येणाऱ्या बऱ्याच समस्या या माध्यमातून मिटण्यास मदत होणार आहे.
अशा पद्धतीने घरबसल्या शोधा मतदार यादीतील तुमचे नाव
विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपली असून या निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जोरदारपणे सुरू आहे. अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मतदार यादी अपडेट करण्यात आली असून त्यानुसार 12 विधानसभा मतदारसंघांमधून एकूण 37 लाख 60 हजार 512 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
तसेच मतदार यादी मध्ये नाव शोधायचे असेल तर निवडणुक विभागाच्या माध्यमातून मतदाता पोर्टल सुरू करण्यात आले आहे. मतदाता सेवा पोर्टल व एप्लीकेशनच्या माध्यमातून नाव नोंदणी केलेल्या मतदाराला मतदार यादीतील स्वतःचे नाव शोधता येणार आहे.
याकरिता मतदाराला मतदाता सेवा पोर्टल ॲप डाऊनलोड करणे गरजेचे आहे व हे पोर्टल डाऊनलोड केल्यावर त्या ठिकाणी जाऊन मतदार यादीत आपले नाव आहे की नाही? हे पाहता येणार आहे
. याकरिता या पोर्टलवर मतदाराचे नाव, जन्मतारीख, मतदाराचे वय तसेच जिल्हा, विधानसभा क्षेत्र इत्यादी माहिती भरून तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे शोधता येते.
तुमच्या मतदान कार्डवर जो काही इपीक नंबर म्हणजे मतदान कार्ड वर असलेला नंबर वापरून तुम्ही मतदार पोर्टलवरून मतदार यादीतील स्वतःचे नाव शोधू शकतात.