शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदासाठी ८४ जणांचे अर्ज

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-देशभर प्रसिद्ध असलेलं जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाकडून एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदासाठी ८४ ग्रामस्थांनी अर्ज केले.

यात अकरा महिलांचा सहभाग आहे. नव्या वर्षापासून अकरा नवीन विश्वस्त देवस्थानचा कारभार पाहणार असून अर्ज केलेल्यांपैकी कोणाची निवड होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देवस्थानावर सुरुवातीपासून मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व असून अर्ज केलेल्यांपैकी बहुतेक त्यांचे समर्थक आहेत. फडणवीस सरकारने जून २०१८ मध्ये शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून ट्रस्टचे काम शासनाच्या नियंत्रणात आणून गावातीलच विश्वस्त असण्याची घटना रद्द करून नवीन विधेयक मंजूर केले होते .

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या २०२१ ते २०२५ च्या पंचवार्षिक विश्वस्त निवडीचा कार्यक्रम नगरच्या सहायक धर्मदाय आयुक्तांनी जाहीर केला.

शिंगणापूर येथील मूळ रहिवासी असलेल्यांनी अर्ज करावेत, अशी नोटीस प्रसिद्ध केल्यावरून गावातून ८४ अर्ज दाखल झाले आहेत.

यात अकरा महिलांचा सहभाग आहे. आता २१, २२ व २३ डिसेंबर रोजी अर्जदारांच्या मुलाखती होऊन नवीन वर्षात अकरा विश्वस्तांची निवड होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts