अहमदनगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांमधील अपघाती मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी आ. सत्यजीत तांबे यांनी ट्रॉमा केअर सेंटर्स सुरू व्हावीत, अशी मागणी सभागृहात केली होती.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी आ. सत्यजीत तांबे यांच्यासह उच्च स्तरीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत दोन्ही जिल्ह्यातील ट्रॉमा केअर सेंटरला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आ. तांबेंच्या प्रयत्नांना यश येऊन अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
डोळासणे व वावी येथील ट्रॉमा केअर सेंटर सुरू व्हावेत, यासाठी आमदार सत्यजीत तांबे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा घेऊन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सोमवारी बैठक घेऊ असे सांगितले होते.
सोमवारी आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक पार पडली. त्यामध्ये ट्रॉमा केअर सेंटरचा प्रश्नांवर चर्चा झाली. तसेच डोळासणे व वावी येथे ट्रॉमा केअर सेंटरला मंजूर मिळावी आणि तातडीने काम सुरू व्हावे, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबेंनी बैठकीत केली.
हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आतच डोळासणे व वावी ट्रॉमा केअर सेंटरचा सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले. तसेच संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथे पुणे-नाशिक महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर व्हावे.
यासंंबंधी आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना जागेबाबत पडताळणी करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांची बैठकीला उपस्थिती होती.