अहमदनगर बातम्या

मतदान केंद्रात गोंधळ घातल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

Ahmednagar News : घुमटवाडी येथील मतदान केंद्रामध्ये येऊन एका अनोळखी इसमाने मी टेक्निशियन असल्याचे सांगून बॅलेट मशिनची चौकशी करू लागला, त्याला ओळखपत्र मागितले तर नाही म्हणाला.

त्याला बाहेर जाण्यास सांगितले. त्याने काही कागदपत्रे तेथे टाकली व नंतर उचलून घेतली. या वेळी मतदार केंद्रात जमाव आला. काहींनी मतदान साहित्य उचलले.

काहींनी घटनेचे कीडीओ चित्रीकरण करून ते सोशल मिडीयावर व्हायरल केले. तुम्ही सरकारी माणूस असून, विशिष्ट उमेदवाराचा प्रचार करता, असा आरोप करून आम्ही मतदान होऊ देणार नाहीत, असे सांगू न मतयान बंद पाडले. पोलिसांनी मतदान केंद्राध्यक्षांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे.

घुमटवाडी येथे मतदान सुरू झाले. ४८ मतदान झाल्यानंतर एक इसम तेथे आला व तो म्हणाला की, मी टेक्निशियन असल्याचे सांगत बॅलेट मशिनची चौकशी करु लागला. केंद्राध्यक्ष सतीश काळे यांनी त्याला ओळखपत्र आहे का, अशी विचारणा केली, त्यावेळी त्याच्याकडे ओळखपत्र नसल्याचे समजले. तू मतवान केंद्रातून बाहेर जा, असे सांगितले.

त्यावेळी त्याच्या हातातील कागद खाली पडले, त्याने पुन्हा ते उचलले. त्याच वेळी जमाव मतदान केंद्रात आला. तुम्ही सरकारी माणस असून, विशिष्ट उमेदवाराचा प्रचार करता, असा आरोप करुन आम्ही मतदान होऊ देणार नाहीत, असे सांगुन मतदान बंद पाडले.

काहींना साहित्य उचलले तर काहींनी घटनेचे चित्रीकरण करुन सोशल मिडीयावर व्हायरल केले. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती मतदान केंद्राध्यक्ष काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

त्यानंतर तेथे तहसीलदार उद्धव नाईक आले. त्यांनी तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदलून नवीन माणसांची टिम दिली व मतदान सुरू केले. या घटनेवरुन प्रसार माध्यामतून मोठी चर्चा दिवसभर सुरू होती. याचाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office