अहमदनगर बातम्या

शिवाजीनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ; नागरिकांवर केली दगडफेक..!

Ahmednagar News : सध्या जिल्ह्यात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यात बंद असलेली घरे फोडली जात आहेत. अशीच घटना श्रीगोंदा शहरातील शिवाजीनगर येथे आज पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली.

अज्ञात पाच चोरटयांनी शिवाजीनगर सारख्या गजबजलेल्या मध्यवस्तीत असलेल्या सेवानिवृत्त अधिकारी रामचंद्र पवार यांच्या बंगल्याची खिडकी तोडून घरात प्रवेश करत घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. दरम्यान यावेळी जागे झालेल्या नागरिकांवर या चोरटयांनी गिलवरीने या नागरिकांवर दगडफेक करत पळून गेले.

याबाबत अधिक माहिती अशी, येथील सेवानिवृत्त अधिकारी रामचंद्र पवार पवार यांचे कुटुंबीय बाहेरगावी राहतात त्यामुळे त्यांचा बंगला बंदच असतो; परंतु नातेवाईकांचे लग्न असल्यामुळे दोन दिवस आधीच या बंगल्यात सोन्याचे दागिने आणून ठेवले होते .

याबाबतची माहिती चोरट्यांना समजली त्यानंतर चोरांनी आधी घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु तो तुटला नाही, त्यामुळे त्यांनी खिडकीचे गज कापून खिडकीतून बंगल्यात प्रवेश करून मुद्देमाल चोरून नेला.

दरम्यान शिवाजीनगर परिसरात राहणारे काही नागरिक जागे झाले त्यातील काही सजग नागरिकांनी या चोरट्यांना हटकले, मात्र या चोरट्यांना या नागरिकांच्या दिशने गिलवरीने दगडफेक केली सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही, त्यानंतर चोरट्यांनी जाताना अनेकांच्या घराच्या गेटवर टनक वस्तूने मारत गोंधळ करत तिथून पळ काढला.

याबाबत पोलिसांना माहिती समजल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी गेले परंतु चोरटे काष्टीच्या दिशेने पसार झाले होते. परिसरातील नागरिकांकडून समजलेल्या माहितीनुसार चोरटे टू व्हिलर वर आले होते तोंडाला रुमाल बांधलेले पाच जण होते सीसीटीव्हीमध्ये हे चोरटे कैद झाले आहेत.

आज सकाळी श्वानपथकाला या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते, चोरट्यानीं भरवस्तीत असा गोंधळ घालत नागरिकांच्या दिशेने दगडफेक केल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts