अहमदनगर बातम्या

घास कपात असलेल्या आईच्या डोळ्यादेखत बिबट्याचा दिड वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला

Ahmednagar News : शेतात एक महिला जनावरांसाठी घास कापत होती तर जवळच अवघ्या दिड वर्षाची चिमुकली मुलगी खेळत होती. मात्र अचानक गवतातून निघालेल्या बिबट्याने या चिमुकलीवर हल्ला केला.

या हल्ल्यात चिमुकलीच्या मानेवर बिबट्याचे दात लागल्याने ती जागीच ठार झाली. हि घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली. ओवी सचिन गडाख असे या हल्ल्यात मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना बुधवार दि.१० जुलै सायं. साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा गावात रोडच्या कडेला गडाख वस्ती आहे. गडाख कुटुंबाचा शेती करून दुध व्यवसायावर उदरनिर्वाह आहे. नेहमी प्रमाणे आज देखील त्यांची दैनंदिन कामे सुरू होती.

दुपारी जनावरांची इतर काम आवरून त्यांना चारा काढण्यासाठी मयत ओवीची आई सायंकाळी ओवी हीला घेऊन घास कापण्यासाठी गेली. ओवीला शेताच्या बांधावर ठेवले. ओवी ही बांधावर खेळत होती. तर तिची आई गायांसाठी घास कापत होती. रस्त्याच्या कडेलाच त्यांची वस्ती असल्याने रस्त्याने लोकांची देखील येजा चालूच होती. मात्र बाजूलाच दाब धरून बसलेल्या बिबट्या मात्र त्या चिमुरडीला पाहत होता.

त्याने या चिमुरडीला एकटीच असल्याचे पाहिले आणि काही क्षणातच चिमुरडीवर हल्ला करत तिला तोंडात धरून उचलुन गवतात नेले. हा सर्व प्रकार रस्त्यावरील येणाऱ्या शिक्षकांनी पाहिला. दरम्यान, पिडीत मुलीच्या आईने आरडा ओरडा केला. तेथे एकच गर्दी जमली. सर्वांनी गवताकडे धाव घेतली असता बिबट्याने चिमुरडीला सोडले. तात्काळ त्या चिमुरडीला उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले.

मात्र, तोपर्यंत तिने आपला जीव गमावला होता. रुग्णलयात डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. वनअधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप चिमुरडीचा बळी गेला त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ दोन दिवसात रस्ता रोको करून वनाधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी करणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts