अहमदनगर बातम्या

गोमांस वाहतूक करणारा पीकअप उलटला

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील अहमदनगर पुणे महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात राजस्थानी ढाब्याजवळ गोमांस वाहतूक करणारी पिकअप पलटी झाल्याने चालकासह तिघे जखमी झाले आहेत.

या पीकअपमध्ये दहा गोण्यात भरलेले गोमांस आढळल्याने सुपा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गाडीतील मुद्देमालासह तिघांनाही ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनिकेत प्रकाश कांडेकर यांनी सुपा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, रविवार दि. २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची पिकअप (क्रंमाक एमएच १३ एन १९२९)

ही अहमदनगर पुणे महामार्गाने अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने जात असताना नारायणगव्हाण शिवारातील राज्यस्थानी धाब्याजवळ पीकअप रस्ता दुभाजकाला धडकुन पलटी झाली व त्यामध्ये आसलेले चालकासह तिघे जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी त्यांना मदत करत सुपा पोलिसांना पाचारण केले.

घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अरुण आव्हाड यांच्या सह स.फौ.एस.एन कुटे व पो.हे.काँ एस बी चौधरी यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत पीकअपमधील नईम कदीर कुरेशी (रा.बंगाल चौकी अहमदनगर),

अफजान आब्दुल कुरेशी (रा.सुभेदार गल्ली झेंडी गेट अहमदनगर) व अल्ताफ यासीन कुरेशी (बंगाल चौकी) या तिघांना ताब्यात घेत गाडीमधील सुमारे ३७,५०० रूपये किंमतीचे २५० किलो गोमांस तसेच १,५०,००० रूपये किंमतीची एक पांढऱ्या रंगाची पिक अप असा एकूण १,८७,५०० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts