राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असून ग्रामीण भागापासून तर मोठ्या शहरांपर्यंत आता कार्यकर्ते ते नेते मंडळी कामाला लागल्याचे चित्र आहे. राज्यातील महाविकास आघाडी असो किंवा महायुती यामध्ये जागांबाबत रस्सीखेच असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. काही काही ठिकाणी तर मित्र पक्षांमध्येच जागा वाटपावरून वाद होतील की काय असे देखील शक्यता आपल्याला दिसून येत आहे.
जागा वाटपावरून पक्षांना बंडखोरीला देखील सामोरे जावे लागू शकते. याचप्रमाणे जर आपण अहमदनगर शहर विधानसभेच्या जागेबाबत पाहिले तर या ठिकाणी ही जागा भाजपकडे घेण्याबाबत ठराव करून तसेच पत्रच भाजप प्रदेशाध्यक्षांना पाठवण्याचा निर्णय शहर भाजपच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला असून या संबंधी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा करता यावा याकरिता सर्वसमावेशक समिती देखिल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
भाजपला जागा न सोडल्यास प्रसंगी वेगळा विचार करू – नगर शहरातील भाजप नेत्यांचा इशारा
अहमदनगर शहर विधानसभेची जागा भाजपकडे घेण्याबाबत ठराव करून तसे पत्र प्रदेशाध्यक्षांना पाठविण्याचा निर्णय शहर भाजपच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. तसेच, यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा करण्यासाठी सर्वसमावेशक समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
भाजपला जागा न सोडल्यास प्रसंगी वेगळा विचार करू, असा इशाराही काही नेत्यांनी दिला.शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली शहर विधानसभा मतदारसंघातील निवडक कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी शहरात झाली.
यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, विधानसभा अध्यक्ष महेंद्र गंधे, वसंत लोढा, सुनील रामदासी, मधुसुदन मुळे, दामोधर बठेजा, गीता गिल्डा, सुरेखा विद्ये, नरेंद्र कुलकर्णी, सचिन पारखी, सीए राजेंद्र काळे आदी उपस्थित होते.अभय आगरकर यांनी ही जागा भाजपकडे ठेवण्याबाबत ठराव मांडला.या ठरावाला पदाधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवून संमती दिली.
याच बाबत एक समिती नेमू, ही समिती पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन जागेची मागणी करतील, असे आगरकर यांनी यावेळी सांगितले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, महेंद्र गंधे, सुनील रामदासी यांनी यावेळी मते मांडली.
वसंत लोढा म्हणाले, अनेक वर्षांपासून ज्यांच्या विरोधात लढलो, आता त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढायची का? ही जागा भाजपला का हवी आहे, हे पक्षश्रेष्ठींना पटवून द्यावे लागेल. शक्य झाले, तर मैत्रीपूर्ण लढतही करता येईल. तसे झाले नाही, तर आपण स्वतः बंडखोरीसाठर तयार आहोत.
नेत्यांनीही खालच्या कार्यकर्त्यांचे काम करावे
बैठकीत अनेकजणांनी आपण निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचे सांगितले. इच्छुक उमेदवार असे सांगितले जात असताना, ज्येष्ठ नेते नरेंद्र कुलकर्णी यांनी त्यावर आक्षेप घेतला. केवळ पाच जण इच्छुक आहेत, हे कुर्णी ठरविले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावरून बैठकीत बराचवेळ चर्चा सुरू होती. व्यासपीठावरील कुणाही नेत्याला तिकिट मिळाले तर इतरांनी त्यांचे काम करावे, तसेच जे कार्यकर्ते व्यासपीठावर नसून खाली बसले आहेत त्यापैकी कुणाला तिकिट मिळाले तरी व्यासपीठावरील नेत्यांनी त्यांचे काम करण्याची तयारी ठेवावी, असे अनिल मोहिते म्हणाले.