Ahmednagar News:कर्जत तालुक्यातील ग्रामसेवकास मारहाण केल्याच्या घटनेला एक दिवस उलटत नाही तोच दारु प्यायला पैसे दिले नाहीत म्हणुन ग्रामसेवकाच्या मोटारसायकलला धडक दिली.
सरकारी कामात आडथळा आणुन शिवीगाळ व मारहान करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना पाथर्डी तालुक्यातील मढी या गावात घडली.
याबाबत मढी येथील ग्रामसेवक विठ्ठल राजळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरबाज रमजान शेख (रा. मढी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मढीचे ग्रामसेवक राजळे हे काल सायंकाळी पाच वाजता कार्यालयात काम करीत होते. यावेळी तेथे तीन चार लोक उपस्थीत होते.
आरबाज रमजान शेख तेथे आला व पाईपलाईन फुटली आहे ते लिकेज काढा व दारु प्यायला पैसे द्या. असे म्हणुन आरडाओरडा करु लागला.
ग्रामसेव राजळे यांनी त्याला तेथुन जायला सांगितले तर त्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. राजळे हे तेथुन एका कर्मचाऱ्यासोबत झाडे लावण्यासाठी जागा पहायला गेले असता तेथे जाऊन आरबाज शेख याने राजळेंच्या गाडीला धडक देवुन त्यांना जखमी केले.
तु दारु प्यायला पैसे दे नाहीतर गावात कसा येतो व नोकरी कसा करतो हे पाहतो. असे म्हणुन सरकारी कामात आडथळा आणला. तेथेही राजळे यांनी शिवीगाळ केली. यावरून पाथर्डी पोलिसांनी आरबाज शेख याला अटक केली आहे.