Ahmednagar Accident : भरधाव वेगाने जाणारी दुचाकी रस्त्यावर आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर बसलेली युवती ठार झाल्याची घटना संगमनेर – नगर रस्त्यावरील गणपती मंदिरासमोर नुकतीच घडली. याप्रकरणी पोलिसांनी गौरव मच्छिद्र लेबे याच्याविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील देवाचा मळा येथे राहणारा गौरव मच्छिद्र लेबे हा आपल्या स्कुटी वरून बुधवारी (दि. 26) जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जात होता.
ही दुचाकी नगर रस्त्यावरील गणपती मंदिरासमोर आल्यावर रस्त्यावर आदळली. या अपघातामध्ये दुचाकीचे टायर फुटले. दुचाकीवर बसलेली रेणुका पांडुरंग खरात (वय २५, रा. इंदिरानगर) ही दुचाकीवरून खाली पडली.
या अपघातामध्ये तिला गंभीर मार लागला. तिला उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.