अबब! शिर्डी विमानतळाबाबत झालंय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीच्या १४ किमी नैऋत्येस काकडी गावाजवळ असणारे विमानतळ बांधकाम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने बांधले व यासाठी एकूण बांधकामखर्च सुमारे ३४० कोटी रुपये लागला.

१ ऑक्टोबर २०१७ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले. ह्या विमानतळामुळे शिर्डीच्या साईबाबा मंदिराला भेट देणाऱ्या लाखो भक्तांना विमानाने शिर्डीला प्रवास करण्याची संधी उपलब्ध झाली. परंतु आता याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या विमानतळाने काकडी ग्रामपंचायतीचे तब्बल 4 कोटी रुपये थकवले आहेत. तशी नोटीस काकडी ग्रामपंचायतीने शिर्डी विमानतळ प्रशासनास दिली आहे. विशेष म्हणजेत हे विमानतळ सुरु होऊन पाच वर्षे झाली आहेत. मात्र, अद्यापही या विमानतळाने काकडी ग्रामपंचातीला कर दिलेला नाही.

त्यामुळे आता नोटीस पाठवली आहे. त्यानंतरही विमानतळ प्रशासनाने कराचा भरणा केला नाही; तर ग्रामपंचायतीमार्फत कडक कारवाई केली जाईल, असे ग्रामसेवकांनी सांगितले. तसेच, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 129 प्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ग्रामसेवक बाचकर यांनी दिली.

पाच वर्षांपूर्वी काकडी ग्रामपंचायतीने विमानतळ उभारण्यासाठी प्रशासनाला जागा दिली. त्यानंतर 2015-2016 साली शिर्डी विमानतळाचे काम पूर्ण झाले. मात्र, पाच वर्षे उलटले असूनही विमानतळ प्रशासनाने ग्रामपंचायतीला कर दिलेला नाही.

त्यामुळे काकडी-मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या नगरसेवकांनी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या व्यवस्थापकास नोटीस बजावली. तसेच ग्रामपंचायतीचा कर भरण्यास सांगितले आहे.

सन 2016 -17 या वर्षापासून या विमानतळावर कर आकारणी लागू सन 2016 -17 ते सन 2019 – 20 पर्यंत 2 कोटी 95 लाख 57 हजारांचा कर तर सन 2020 – 21 या वर्षांत 1 कोटी 69 हजार हजारांचा कर असा मिळून एकूण 4 कोटी 2 लाख 48 हजार 56 रुपये कर थकीत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts