अहमदनगर बातम्या

Ahmednagar City News : अघोषित भारनियमन रद्द करा ! महावितरण कार्यालयासमोर आंदोलन

Ahmednagar City News : भिंगार शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने ‘अघोषित भारनियमन रद्द करावे’ या मागणीसाठी भिंगार महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

यावेळी भिंगार शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर चाबुकस्वार, कार्याध्यक्ष बाळासाहेब भिंगारदिवे, उपाध्यक्ष संतोष धिवर, संघटक सतीश बोरूडे, सरचिटणीस सोपान काका साळुंके, सुनिता जाधव, योगेश बोरबणे, रहिम खान, परवेज शेख, धीरज परदेशी, आसिफ शेख आदींसह नागरिक उपस्थित होते.

यावेळी शहराध्यक्ष चाबुकस्वार म्हणाले, गेल्या दोन-तीन दिवसांपासून भिंगार शहरात वारंवार वीज बंद करण्यात येत आहे. तसेच नागरिक हे महावितरण कक्षाला फोन करून संपर्क करतात पण तेथील कर्मचारी हे फोन देखील उचलत नाही.

त्यामुळे आता नागरिकांनी तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न उपस्थित होतो… त्यामुळे भिंगार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts