Ahmednagar News:अहमदनगर महामार्गावर रांजणगावजवळ आज पहाटे खासगी बसला अपघात झाला. यामध्ये दहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बसमध्ये ४५ प्रवासी प्रवास करत होते. त्यातील १० जखमी झाले असून चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. दिवाळीच्या सुट्टीवर गावी गावी निघालेल्या प्रवाशांचा यामध्ये समावेश आहे.
पहाटेच्या सुमारास पुण्यातून नगरच्या दिशेने निघालेली ही बस वेगात होती. पहाटेच्या वेळी रस्त्यावर वाहने नसल्याने बस चालक बस भरधाव चालवत होता. मात्र रांजणगाव येथे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस उलटली.
अचानक झालेल्या घटनेने प्रवासी अत्यंत्य घाबरलेल्या स्थितीत आहेत. पुण्याला जाणारी ही प्रवासी बस रांजणगावजवळ आली असता पहाटेच्या सुमारास ही बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस उलटली. त्यामुळे ऐन सणासुदीला प्रवाशांवर संकट ओढावले. या घटनेने रांजणगाव येथे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.