Ahmadnagar breaking : राहाता न्यायालयालगत असलेल्या प्लॉटिंगमध्ये बेवारस मृतदेह आढळून आला आहे.
घटनेची माहिती गोरक्षनाथ खाकाळे यांनी पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाट, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधाकर काळोखे, पोलीस नाईक गणेश गडाख, पोलीस नाईक धीरज अभंग यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.
त्या ठिकाणी पुरुष अंदाजे ६५ वर्ष वयाचा अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व व पायजमा डोक्याचे केस पांढरे उंची अंदाजे साडेपाच फूट, बारीक दाढी पांढऱ्या रंगाची असणारा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी हा मृतदेह शिर्डी येथील शवागृहात ठेवला असून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी राहाता पोलीस स्टेशनची संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी केले आहे.