अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : शाळेचं गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू, पालकांत खळबळ !

अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. शाळेचे गेट अंगावर पडून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.

ही दुर्घटना अकोले तालुक्यात समशेरपूर येथील अगस्ति विद्यालयात घडली आहे. पांडुरंग बाळू सदगीर (रा. मुथाळणे, ता. अकोले) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.

यात एक जण जखमीही झाला असल्याची माहिती मिळाली आहे.गेट उघडत असताना ते तुटले. गेट पडल्याचे पाहून काही मुले तेथून पळून गेली.

मात्र पांडुरंग बाळू सदगीर हा विद्यार्थी गेटखाली सापडला. त्याला पळून जाण्याची संधी मिळाली नाही. त्याच्या डोक्याला मार लागला. गेट जड असल्याने मुलांना उचलता आले नाही.

गेट कोसळल्याने मुलेही घाबरली होती. त्यानंतर शिक्षक धावत आले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येत दरवाजा उचलला.

तोपर्यंत सदगीर गंभीर जखमी झाला होता. डोक्याला मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

या घटनेत दूर एक विद्यार्थी जखमी झाला आहे. माहिती मिळताच पालकांनी शाळेत धाव घेतली.

या घटनेला शाळा प्रशासन जबाबदार असल्याची चर्चा रंगली आहे. जखमी मुलाला लवकर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप पालकांनी केलाय.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts