अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : दोन भावांसह त्यांच्या बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू ! परीसरात हळहळ

Ahmednagar News : पाझर तलावात कपडे धुण्यासाठी आई आणि कुटुंबातील महिलांसह गेलेल्या खडा येथील दोन बंधूसह त्यांच्या बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना खड्यांपासुन ३ कि.मी अंतरावर असलेल्या शिर्डी-हैदराबाद महामार्गावरील आंतरवली फाटा येथील पाझर तलावात गुरुवारी (दि. ५) घडली.

या घटनेने खड्यांसह जामखेड परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिपक ज्ञानेश्वर सुरवसे (१६ वर्षे), सानिया ज्ञानेश्वर सुरवसे (१४ वर्षे), कृष्णा परमेश्वर सुरवसे ( १६ वर्षे, तिघे रा. खर्डा) असे तलावात बुडून मृत्यूमुखी पावलेल्या बंधू-भगिनीचे नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, खर्डा येथील सुरवसे कुटुंबातील एका वृध्द व्यक्तीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे सुरवसे कुटुंबातील महिला गुरुवारी (दि. ५) सकाळी सुतक फेडण्यासाठी तीन कि.मी अंतरावर असलेल्या आंतरवली फाटा येथील पाझर तलावात घरातील कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.

यावेळी मयत तीनही मुले आपल्या आईला मदत करण्यासाठी सोबतच होते. कुटुंबातील महिला कपडे धूत असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कु. सानिया ज्ञानेश्वर सुरवसे हीचा पाय घसरला व ती पाण्यात पडली.

मात्र तिला पोहता येत नसल्याने ती पाण्यात बुडू लागली. हे तिचा भाऊ दिपक ज्ञानेश्वर सुरवसे व कृष्णा परमेश्वर सुरवसे यांच्या लक्षात आल्यावर दोघे बंधू तिला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र त्यांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. शेवटी तेही पाण्यात बुडाले.

ही बाब त्या ठिकाणी कपडे धुत असलेल्या मयत सानिया व दिपक यांच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्या देखील मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्या. मात्र त्याही पाण्यात बुडत असताना आजुबाजूला असलेल्या लोकांनी पाहिल्यावर त्यांना वाचविण्यात यश मिळविले. मात्र या घटनेत तीनही बहीण-भावांचा बुडून दुर्दैवीरित्या मृत्यू झाला.

ही घटना वाऱ्यासारखी खड शहरात पसरली. यानंतर घटनास्थळी खर्डा माजी उपसरपंच भागत सुरवसे, योगेश सुरवसे, लखन नन्नवरे, बिबीशन चौगुले, मयुर डोके, बाबासाहेब डोके, विशाल मुरकुट यांनी धाव घेऊन बुडालेल्या मुलांना पाण्यातून बाहेर काढले व खर्डा येथील रुग्णालयात दाखल केले.

मात्र त्यापुर्वीच तिघांचा मृत्यू झाला असल्याने त्यांना शवविच्छेदनासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीनही मुलांचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts