Ahmednagar News : दुचाकी, चार चाकी वाहने चोरल्यानंतर त्या वाहनांची भंगारात विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
नगरमधून चोरलेल्या ढंपरची नांदेडमध्ये एका भंगार दुकानात विल्हेवाट लावली जात असताना पोलिसांनी तेथे छापा टाकत दोघांना ढंपरसह ताब्यात घेवून नगरला आणले आहे.
न्यायालयाने दोघांना चार दिवस पोलिस कोठडी दिली असून पोलिस आता त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथील ज्ञानेश्वर बाळु कुंजीर यांनी त्यांच्या मालकीचा ढंपर (क्र. एम एच १६ क्यु ७९७८) ढंपर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता.
त्या ढंपरला जीपीएस सिस्टीम असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी तातडीने ढंपरचा शोध घेण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलिस अंमलदार कमलेश पाथरूट, सुभाष थोरात, संभाजी बोराडे, सागर मिसाळ यांचे पथक तयार करून रवाना केले.
पोलिसांनी तेथे तात्काळ छापा टाकत गजानन संभाजी भोसले (वय ३३, रा. सुहागन, ता. पूर्णा, जि. परभणी) व अख्तरखां ताहेरखां पठाण (वय ५५, रा. पीरबुऱ्हाणनगर, नांदेड) या दोघांना ताब्यात घेतले.