अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : 38 वर्षीय इसमाची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे एका 38 वर्षीय व्यक्तीने घराच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. मोहन हिरामण आरणे असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तळेगाव दिघे येथे मोहन हिरामण आरणे हे राहत होते. मंगळवारी दुपारी घराच्या सिमेंट छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने मोहन आरणे यांनी गळफास घेत

आत्महत्या केली. त्यांची पत्नी कामासाठी बाहेर गेलेली होती, ती दुपारी घरी आल्यावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. गळफास घेतलेल्या स्थितीत मोहन आरणे यांचा मृतदेह आढळून आला.

याबाबत पोलीस पाटील दत्तात्रय इल्हे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पो. हे. कॉ. लक्ष्मण औटी यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली घेतला व पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts