अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील या बहुचर्चित प्रकरणातील आरोपीचा कोठडीतच मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यातील पाथर्डी येथे 21 वर्षांपूर्वी माणुसकीला काळिमा फासणारी घटना कोठेवाडी गावात घडली होती. या घटनेतील एका कैद्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे.

हा कैदी मोक्का अंतर्गत हर्सल तुरुंगात शिक्षा भोगत होता. यासोबतच हर्सूल कारागृहातील आणखी एका कैद्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, हर्सूल कारागृहात कोठेवाडी प्रकरणातील हाब्या पानमळ्या भोसले ( ५५, कैदी क्रमांक सी- ६५४४ ) हा ‘मोक्का’ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा भोगत होता.

आरोपी भोसले याला कारागृहातून घाटी रुग्णालयात उपचारासाठी सोमवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान नेण्यात आले होते. दरम्यान भोसले याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

तसेच घाटी रुग्णालयातील वार्ड क्रमांक १० मध्ये दुसरा कैदी रमेश नागोराव चक्रुपे ( 60, कैदी क्रमांक सी- ८५७२ ) हा उपचार घेत होता. सोमवारी पहाटे अडीजच्या सुमारास त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मागील काही काळापासून दोन्ही कैदी हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत असून, त्यांचा सोमवारी मृत्यू झाला आहे. हे दोन्ही आरोपी बाहेरील जिल्ह्यातील होते.

काय होते कोठेवाडी प्रकरण? – 17 जानेवारी 2001 रोजी मध्यरात्री साडेतीन वाजता कोठेवाडी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथे संपूर्ण वस्तीवर 10 ते 15 आरोपींनी दरोडा घालून जबर मारहाण करीत 4 महिलांवर सामूहिक बलात्कार केला होता.

या वस्तीवरुन 44 हजार 35 रुपयांचे दागिने लुटले होते. सर्व 13 आरोपींना कोठेवाडी प्रकरणात नगरच्या न्यायालयाने जन्मठेप सुनावली होती. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पाहिले होते.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या कोठेवाडीतील दरोडा-बलात्कार प्रकरणासह आरोपींचा पाथर्डी, गंगापूर व यावैजापूर तालुक्यांमध्ये दरोडा, मारहाण, बलात्कार, सामूहिक बलात्कार आदी गुन्ह्यातील सहभाग पोलिसांच्या निदर्शनास आला.

यामुळे सर्व आरोपींवर औरंगाबादच्या विशेष मोक्का न्यायालयात खटला चालला. येथे 13 आरोपींना 12 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 10 लाखांचा, तर एकूण 1 कोटी 30 लाखांचा दंड मोक्का न्यायालयाने ठोठावला होता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts