अॅड. प्रतापराव ढाकणे यांच्या सोबत घडला धक्कादायक प्रकार, अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्का देणारी बातमी आली आहे. नगर – वडगाव गुप्ता परिसरात असलेल्या शेतजमिनीत प्लॉट पाडून परस्पर सुमारे ३३ जणांना खरेदीखत करून देत विक्री करून एकाने राष्ट्रवादीचे अॅड. प्रताप ढाकणे यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात श्रेणिक धरमचंद खाबिया (रा. सावेडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रताप ढाकणे यांनी शुक्रवारी (दि.१९) दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली आहे.

अॅड. ढाकणे यांच्या मालकीची एन.ए. न केलेली अविभक्त शेतजमीन आहे. त्यांच्या शेजारीच आरोपी श्रेणिक खाबिया याचीही काही शेतजमीन होती. खाबिया याने अॅड. ढाकणे यांना कुठलीही कल्पना न देता त्यांच्या जमिनीसह ढाकणे यांच्या जमिनीतही प्लॉट पाडून सुमारे ३३ जणांना सदर जमीन आपल्याच मालकीची आहे असे भासवून विक्री केली.

त्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखते ही करून दिली. या ३३ पैकी अनेकांनी तेथे त्यांच्या मर्जीनुसार तारेचे कुंपण तर काहींनी कोणतीही परवानगी न घेता पक्की घरे बांधली आहेत. त्यांनी रस्ता व वहिवाटीचा कुठलाही विचार न करता अतिक्रमणे केली आहेत. हा सर्व प्रकार ९ ऑगस्ट २०१९ ते ५ मार्च २०२४ या कालावधीत घडला आहे.

ही बाब निदर्शनास आल्यावर अॅड. ढाकणे यांनी या ३३ जणांच्या खरेदीखतांचे अवलोकन केले असता सदर जागा ही बिगर शेती केलेली नसतानाही गुंठेवारी करून आणि चतुर्सिमा न ठरवताच खाबिया याने विक्री करत आपली फसवणूक केली

असल्याचे अॅड. ढाकणे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी भा.दं.वि.४२०, ४४७, ४४८ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts