अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : आयशरची दुचाकीला धडक,तरुणाचा जागीच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :-  कोपरगाव तालुक्यातील सवंत्सर येथील तरुण नागरपूर मुंबई महामार्गावरून दुव्हकीने प्रवास करीत असताना कोकमठाण शिवारातील मुंबई नागपूर महामार्ग वर अपघात होऊन दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

ही घटना शनिवार दि 6 नोव्हेंबर रोजी सकाळी घडली आहे. प्रवीण शिवाजी रोहोम वय 23 वर्ष राहणार संवत्सर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

भाऊबीजेच्या दिवशी ही दुर्घटना घडल्याने संवत्सर शिवारात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आयशर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,प्रवीण हा शनिवारी सकाळी आपली दुचाकी घेऊन नागपूर महामार्गाने प्रवास करीत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या

वाहनाने जोरदार धडक दिली या धडकेत प्रवीण खाली पडला व वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ,दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले व मृतदेहाला अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले,

दरम्यान मृत प्रविणचे काका बाळासाहेब सोपान रोहोम(वय-50) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आयशर चालकाविरुद्ध गु र न 331/21 भादवी कलम 304 (अ)279 338 427 मो वा का कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts