अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : नगराध्यक्षांकडून अभियंत्याला मारहाण ! सीसीटीव्हीमध्ये चित्रित…

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 AhmednagarLive24:- सांगितलेले काम वेळेत केले नाही म्हणून नगराध्यक्षांचा पारा चढला आणि त्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्याला मारहाण केली. दालनात सुरू झालेली धक्काबुक्की बाहेरपर्यंत आली.

शेवटी महिला मुख्याधिकारी मध्ये पडल्या आणि त्यांनी मोठ्या धाडसाने वाद सोडवत आपल्या अधिकाऱ्याची सुटका केली. पारनेर नगरपंचायतीच्या कार्यालयात मंगळवारी ही घटना घडली.

नवनिवार्चित नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांचे समर्थक विजय सदाशिव औटी यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सचिन राजभोग यांना मारहाण केली.

नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सुजाता कुमावत धावून आल्या. वाद सोडविताना डॉ. कुमावत यांनाही धक्के बसले. शेवटी दोघांच्या मध्ये येऊन हाताचे कडे करून कुमावत यांनी हे भांडण सोडविले.

यासंबंधी अद्याप पोलिसांकडे फिर्याद देण्यात आलेली नाही. हा सर्व प्रकार नगरपंचायतीच्या कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office