अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकींग: शिवसेनेच्या ‘त्या’ पदाधिकार्‍याचा खंडपीठाकडून जामीन अर्ज नामंजूर

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagarlive24  :-महिलेवर अत्याचार करून पसार झालेला शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे (रा. जेऊर ता. नगर) याचा अटकपुर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने नामंजूर केला आहे.

यामुळे मोकाटेच्या अडचणीत वाढ झाली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केल्याने मोकाटेने जामिनासाठी औरंगाबाद खंडपिठात धाव घेतली होती. तेथेही जामीन अर्ज नामंजूर झाला आहे.

मोकाटे याने अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या महिलेवर अत्याचार केला होता. या प्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणात आरोपीवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टप्रमाणे वाढीव कलम देखील लावण्यात आलेले आहे. आरोपी मोकाटे पसार असून, त्याच्यावतीने उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीन ठेवण्यात आला होता.

महिलेवर झालेल्या अत्याचाराचा गुन्हा गंभीर असून, या प्रकरणाचा तपास अजून पुर्ण झालेला नाही. आरोपी मोकाटे राजकीय व्यक्ती असल्याने तपासात बाधा आणून ढवळाढवळ करू शकतो.

या परिस्थितीमध्ये त्याला जामीन देणे योग्य नसल्याचा युक्तीवाद करण्यात आला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती व्ही. के. जाधव व संदीपकुमार मोरे यांनी मोकाटेंचा अटकपुर्व जामीन नामंजूर केला आहे. पिडीत महिलेच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ आर. एस. देशमुख यांनी बाजू मांडली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts