अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकींग: पती घरी नसताना पत्नीला उचलून बेडरूमकडे नेले अन्

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 AhmednagarLive24 :-शनिवारी पती मुंबईला गेला, पत्नी घराजवळील किराणा दुकानात होती. रात्री आठ वाजता एक व्यक्ती किराणा दुकानात सिगारेट घेण्यासाठी आला आणि त्याने दुकानात असलेल्या महिलेला शिवीगाळ, मारहाण करत तिचा विनयभंग केला.

अहमदनगर शहरात शनिवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी आयाज सय्यद (पूर्ण नाव माहिती नाही, रा. गाझीनगर, काटवन खंडोबा रोड, अहमदनगर) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंग,

मारहाण, शिवीगाळ आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला शनिवारी रात्री तिच्या किराणा दुकानात असताना आयाज सय्यद तेथे आला.

त्याने फिर्यादीकडे सिगारेटची मागणी केली. फिर्यादी यांनी सिगारेट दिल्यानंतर पैसे घेत असताना त्याने फिर्यादीचा हात धरला. तिला उचलून घेत बेडरूमकडे घेवुन गेला आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

पीडिताने आरडाओरडा केला असता आयाजने तिला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली.‘तु जर कोणाला काही सांगितले तर, तुला जीवे ठार मारीन’, अशी धमकी दिली असल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts