अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- अज्ञातांनी रात्रीतून महापालिकेचे 24 पैकी 18 शौचालये पाडून जागा बळकविण्याचा प्रयत्न केला आहे. याची चर्चा दिवसभर शहरात होती.
याप्रकरणी महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. महापालिकेचे सुफरवायझर ज्ञानेश्वर शिवाजी झारेकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरूद्ध सार्वजनिक संपत्तीचे नुकसान कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अज्ञात व्यक्तींनी महापालिकेचे 18 सार्वजनिक शौचालय शनिवारी रात्री पाडले. यामध्ये महापालिकेचे चार लाखांचे नुकसान झाले आहे.
मनपाने गुन्हा दाखल केल्यानंतर कोतवाली पोलिसांनी शौचालय पाडणार्यांचा शोध सुरू केला आहे.
शहरातील झारेकर गल्लीतील रिमांड होम शेजारी महापालिकेचे 24 सार्वजनिक शौचालय होते. हे सार्वजनिक शौचालय परिसरातील नागरिक वापरत होते.