अहमदनगर :- कामावर हजर न झालेल्या २१ कर्मचाऱ्यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मनपासमोर धरणे आंदोलन केले होते. घनकचरा विभागाने कामाच्या सोयीसाठी २१ कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश दिले होते.
बदली आदेशानुसार रुजू होण्यास नकार दिल्याने प्रशासनाने त्यांना कामावर हजर होण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या. ते कामावर रुजू न झाल्याने घनकचरा विभागाने तसा अहवाल सादर केला होता. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता परस्पर कामावर गैरहजर राहिल्याने या कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचे आदेशात म्हटले आहे.