अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- न्यायालयात सुरू असलेली विनयभंगाची केस मागे घे, नाही तर संपूर्ण खानदान खल्लास करून टाकू, अशी धमकी देत राजेश तुकाराम जाधव (वय 54 रा. सातभाई मळा, दिल्लीगेटजवळ, नगर) यांना तिघांनी मारहाण केली.
प्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मदन पुरोहित (पूर्ण नाव माहिती नाही), अजित मदन पुरोहित, परेश पुरोहित (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. रेणाविकार कॉलनी, साताळकर हॉस्पिटलजवळ, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
राजेश जाधव हे त्यांचा भाऊ सतीश जाधव यांना गोळ्या औषध देण्यासाठी साताळकर हॉस्पिटल येथे गेले होते. त्या वेळी मदन पुरोहित त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला न्यायालयात चालू असलेली केस मागे घे, असे म्हणून त्याने मारहाण करत ढकलून दिले.
घाबरून राजेश जाधव हे भावाच्या घरी गेले. तेथे मदन पुरोहित, अजित पुरोहित हे सत्तुर, तलवार घेऊन आले.
दमदाटी करून न्यायालयात सुरू असलेली विनयभंगाची केस मागे घे, नाहीतर संपूर्ण कुटुंब खल्लास करून टाकू अशी धमकी दिली.
परेश पुरोहित यांनीही शिवीगाळ करून मारून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश चौधरी करीत आहे.