अहमदनगर शहर

नगर तालुक्यातील’या’ परिसरात रानडुकरांचा उच्छाद!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  नगर तालुक्यातील बहिरवाडी परिसरात रानडुकरांनी उच्छाद मांडल्याने मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होत आहे. या परिसरात रानडुकरांनी ज्वारी, कांदा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.(Ahmednagar news)

कांदा पिकाचे तर अतोनात नुकसान करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे अगोदरच सर्व पिके विविध रोगांना बळी पडलेली आहेत. महागडी औषध फवारणी करून शेतकरी पिके वाचविण्याच्या प्रयत्नात आहे.

त्यातच रानडुकरे पिकांची नासाडी करत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह महसूलच्या कर्मचाऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत.

वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या परिसरात गेल्या ४ ते ५ वर्षांत रानडुकरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, संपूर्ण पंचक्रोशीतील शेतपिकांची नासाडी सुरू आहे.

डोंगररांगा मोठ्या प्रमाणात असल्या तरी रानडुकरांचा वावर मानव वस्तीतदेखील आढळून येतो. रानडुकरांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याच्या घटनादेखील परिसरात घडलेल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts