अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या इंगळे वस्ती येथे किरकोळ कारणातून पती-पत्नीस लाकडी दांडक्याने तसेच दगडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दरम्यान या मारहाणीत विशाल दादा जगधने (वय 26, रा.इंगळे वस्ती, रेल्वे स्टेशन) व त्यांची पत्नी जखमी झाली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी विशाल जगधने यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी वसीम निसार शेख, बब्ब्या पठाण,
वसीमची बायको, बहिण व अनोळखी 2 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी वसीम शेख यास पोलिसांनी अटक केली आहे.