अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- आशा टॉकीज चौकामध्ये रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
यासाठी कै बाळासाहेब देशपांडे दवाखाना भोसले आखाड्यातील मनपा प्रभाग क्रमांक चार समितीच्या जागेवर भव्य दिव्य असे इमारत उभा करण्यात यावी.
त्यासाठी उपाय योजना करण्याच्या सूचना उपमहापौर गणेश भोसले व स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी दिले. स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी शहरातील रस्ते विकसित व इमारतीचे नूतनीकरण याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कै. बाळासाहेब देशपांडे दवाखान्याचे स्थलांतरित करण्यासाठी जी चर्चा झाली. या दवाखान्यासाठी सुमारे १९ कोटी निधी मंजूर आहे. तसेच मंजूर रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावी.
रस्त्यांच्या मध्यभागी विजेचे पोल स्थलांतरित करण्यासाठी उपाय योजना कराव्या. तसेच रस्त्यावरील अतिक्रमणे काढावी.
आमदार संग्राम जगताप यांनी काटवन खंडोबा रस्ता विकसित करण्यासाठी साडेआठ कोटी रुपयांची निधी शासनाकडून मंजूर करून आणला.
याच बरोबर प्रभाग क्रमांक ११मधील जुने सोलापूर रस्ता ते कानडे मळा महावितरण कार्यालय चे रस्त्यासाठी साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.
या विकासकामातील अडथळे तातडीने दूर करावी. जेणेकरून रस्त्याच्या कामाला गती मिळेल असे ते म्हणाले.