अहमदनगर :- कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऑलिम्पिक खेळाडू पटू दत्तू भोकनळ व खो खो खेळाचे राष्ट्रीय खेळाडू व पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त व चार्टर्ड अकाउंटंट श्री अशोक जी पितळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सचिव माननीय जी खानदेशी साहेब यांनी भूषवले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर यांनी केले वरिष्ठ महाविद्यालय क्रीडा विभागाच्या राष्ट्रीय खेळाडू व महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर शरद मगर यांनी केले.
तसेच कनिष्ठ महा प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांची ओळख काळे यांनी केले सदर कार्यक्रमास अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील तसेच उपाध्यक्ष रामचंद्र जी दरे साहेब उपस्थित होते.
तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने खेळाडू पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक नितीन काळे यांनी तर सूत्रसंचालन राष्ट्रीय खेळाडू डॉक्टर अर्चना रोहोकले यांनी केले
कार्यक्रमात बोलताना दत्तू भोकनळ म्हणाले की खेळाडूंना अभ्यास आणि खेळ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत सतत जिंकणाऱ्या खेळाडूला करण्याचे महत्त्व नसते तोपर्यंत तो हवेत असतो तो जेव्हा हरतो तेव्हा जमिनीवर येतो आणि मग त्यांच्या यशाची वाटचाल सुरू होते हल्लीच्या काळात तरुण मुले हेअर स्टाईल मोबाईल यांच्या गुंतून पडलेले आहेत तो वेळ त्यांनी शरीर आणि मन भक्कम करण्यासाठी करावा हे ते म्हणाले तसेच त्यांनी स्वतःची जीवन कहाणी सांगून खेळाडूंना प्रेरित केले
अशोक पितळे यांनी आपले विचार मांडताना वीस वर्षांपूर्वी चे वर्णन केले आहे पूर्वी खेळामध्ये भरपूर खेळाडू वेळ देत होते परंतु हल्लीच्या काळात खेळाडू दैनंदिन सर्वांकडे दुर्लक्ष करतात याचं कारण कारणीभूत आहे असे ते म्हणाले आंतरराष्ट्रीय खेळाडू वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ घेत असताना त्यांनी आपले विचार मांडले महाविद्यालयातील उत्तम कामगिरी करत आहे महाविद्यालयातील जिमखाना विभाग नेहमीच काढून घडवण्याचा बाबत उत्तम कामगिरी करत आहे महाविद्यालयाच्या जिमखाना विभागातून एक अर्जुन पुरस्कार 6 शिवछत्रपती पुरस्कार व आतापर्यंत पाचशेहून अधिक राष्ट्रीय खेळाडू यांचा जिमखान्यात विभागातून घडले आहेत यापुढेही ही कामगिरी चालू राहील असे ते म्हणाले