अहमदनगर शहर

चक्क पोलिसांनी रद्दीच्या विक्रीतून सुमारे एक लाख रुपये कमावले

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील विविध अस्थापनांमधील कागदपत्रांच्या रद्दीच्या विक्रीतून सुमारे एक लाख रुपये पोलीस खात्याला मिळले आहेत.(police earned money)

सविस्तर माहिती अशी कि, नगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया मधील विविध आस्थापने मध्ये अनेक वर्षांची कागदपत्रे पडून होती.

या कागद आणि फाईलीं मुळे जागाही अडवून ठेवली जात होती. त्यामुळे या सर्व कागदपत्रांची छाननी करून जे कागदपत्र लागत नाही असे कागदपत्रांचे गठ्ठे रद्दीमध्ये काढण्यात आले आहेत.

१९९७, पासूनची कागदपत्रांची छाननी करून ही रद्दी काढण्यात आली या रद्दीच्या विक्री याबाबत निविदा काढून ही रद्दी विकण्यात आली आहे.

सर्वात जास्त रक्कम असलेली निविदा एक लाखांच्या पुढे असून या मुळे पोलीस खात्याला मोठा फायदा झाला आहे. ही कागदपत्रे पोलिसांच्या उपस्थिती मध्ये रिसायकलिंग साठी नष्ट करण्यात येणार आहेत.

या पूर्वी अशी सरकारी न लागणारी कागदपत्रे जाळण्यात येत असल्याची माहिती होती. मात्र पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेमुळे आता ही कागदपत्रे न जाळता रिसायकलिंग साठी देऊन पर्यावरणाच्या रक्षणासह पोलीस खात्याला फायद्याची ठरली आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Manoj Patil

Recent Posts