अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :- महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार 27 फेब्रुवारी 2022 च्या अनुषंगाने महापौर शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न झाली.
या बैठकीत महानगरपालिका हद्दीतील 0 ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना रविवार, 27 फेब्रुवारी 2022 रोजी पल्स पोलिओ डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे, अशा सूचना महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिल्या आहेत.
नागरिकांनी आपल्या 0 ते पाच वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहनही शेंडगे यांनी केले आहे. मोहीम 100 टक्के यशस्वी होण्याकरिता शहरामध्ये पोलिओ रविवार (पीपीआय) बुथ व त्यानंतर पाच दिवस याप्रमाणे घर भेटीचे (आयपीपीआयचे) नियोजन करण्यात आहे.
तसेच ट्रांझिट, मोबाईल व नाईट टीमचेही आयोजन करण्याचे बैठकीत ठरले. कोविड पार्श्वभूमीवर सर्वसाधारणपणे 100 ते 120 लाभार्थ्यांमागे 1 बुथ याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक बुथवर दोन कर्मचारी नेमून त्यांना त्या दिवशीच 90 टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. पाच बुथमागे एक पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे.
यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती कुमार वाकळे, सभागृह नेता अशोक बडे आदी उपस्थित होते. पोलिओ बुथचे नियोजन असून एकूण 905 कर्मचारी नेमण्यात आले आहे.
महात्मा फुले आरोग्य केंद्र 36, जिजामाता आरोग्य केंद्र 39, तोफखाना आरोग्य केंद्र 42, सिव्हील आरोग्य केंद्र 47, केडगाव आरोग्य केंद्र 41,
नागापूर आरोग्य केंद्र 63, मुकुंदनगर आरोग्य केंद्र 63 व कॅन्टोेन्मेंट हॉस्पिटल 28 याप्रमाणे त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पाच मनपा स्तरीय अधिकारी, आठ वैद्यकीय अधिकारी व 44 सुपरवायझर नियुक्त केलेले आहेत.