अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढू लागले आहे. चोरीच्या घटनांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
नुकतेच कोतवाली पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात दोघांना अटक केली. मनोज लथानियल पाटोळे (वय 45 रा. बुरूडगाव रोड) व जावेद लियाकत सय्यद (वय 37 रा. भोसले आखाडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, 11 ते 14 जानेवारी दरम्यान कायनेटीक चौक व रेल्वे स्टेशन परिसरातील बीएसएनचे 20 हजार 200 रूपये किंमतीचे केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.
याप्रकरणी राजु सदाशिव थोरात (रा. मार्केटयार्ड) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदरचा गुन्हा मनोज पाटोळे व त्याच्या साथीदाराने केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.
केबल जाळून त्यातील तांबे व जर्मनची तार विक्री करण्यापूर्वीच पोलीस पथकाने आरोपी पाटोळे व सय्यद याला अटक केली.