अहमदनगर बातम्या

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगरकरांनो, काळजी घ्या, कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

Ahmednagar Corona Breaking:राज्यतील कोरोना रुग्णसंख्येची परिस्थिती काहीशी सुधारत असताना अहमदनगर जिल्ह्यासाठी मात्र काळजी वाढविणारी बातमी आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे ३१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

कथित तिसरी लाट ओसरल्यानंतरची ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. यामध्ये नगर तालुक्यात सर्वाधिक सात रुग्ण आढळून आले आहेत तर नगर शहरात चार रुग्ण आहेत. याशिवाय पारनेर, राहाता व श्रीरामपूर येथेही प्रत्येकी चार रुग्ण आहेत. संगमनेर व शेवगावला प्रत्येकी दोन रुग्ण आहेत.

अकोले, पाथडी, राहुरी व अन्य जिल्ह्यातील प्रत्येकी एक रुग्ण आहे. भिंगारसह दक्षिण भागातील अन्य तालुक्यांत रुग्णसंख्या अद्यापही शून्य आहे. रविवारी व सोमवारी रुग्णसंख्या लक्षणीय घटली होती. त्यानंतर आज पुन्हा मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात अन्य भागात आकडे कमी होत असताना नगरला मात्र ते वाढत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts