अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- आज 60 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 50 हजार 649 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.90 टक्के इतके झाले आहे.(Ahmednagar Corona Update )
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 70 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 381 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 33, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 30 आणि अँटीजेन चाचणीत 07 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून रुग्णामध्ये मनपा 04, नगर ग्रा 07, नेवासा 01, पारनेर 02, पाथर्डी 02, राहुरी 02, संगमनेर 06, श्रीगोंदा 07 आणि श्रीरामपूर 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 04, अकोले 01, कोपरगाव 01, नगर ग्रा 04, नेवासा 01, पाथर्डी 01, राहाता 04, संगमनेर 02, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 05 आणि इतर जिल्हा 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 07 जण बाधित आढळुन आले. अकोले 01, नगर ग्रा 02, पारनेर 01, राहाता 02 आणि राहुरी 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 06, अकोले 01, कर्जत 01, कोपरगाव 01, नगर ग्रा 05, नेवासा 05, पारनेर 09, पाथर्डी 01,
राहाता 03, राहुरी 02, संगमनेर 06, शेवगांव 02, श्रीगोंदा 04, श्रीरागपूर 11, मिलिटरी हॉस्पिटल 01 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:3,50,649
उपचार सुरू असलेले रूग्ण:381
पोर्टलवरील मृत्यू नोंद:7141
एकूण रूग्ण संख्या:3,58,171
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या