Ahmednagar Dam Water Storage : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठा संदर्भात. खरे तर जून महिन्यात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण थोडेसे कमी राहिले. परंतु जुलैमध्ये जिल्ह्यात चांगला समाधानकारक पाऊस झाला. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली.
यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले मात्र जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये यामुळे पाण्याची आवक वाढली. ऑगस्टमध्ये देखील सुरुवातीच्या काळात अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अहमदनगर जिल्ह्यात चांगला समाधानकारक पाऊस झालाय.
पण आता गेल्या सहा-सात दिवसांपासून जिल्ह्यातील पावसाचा जोर फारच कमी झाला आहे. पाऊस अचानक गायब झाला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात कुठेच पाऊस झाला नाही. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना पावसाचा लपंडाव अन ऊन सावलीचा अनुभव येत आहे. तथापि काही भागात अधून मधून हलक्या पावसाच्या सऱ्या बरसत आहेत.
पण आता जवळपास एका आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने मोठ्या पावसाची पुन्हा एकदा वाट पाहिली जात आहे. तसेच धरणांमध्ये किती पाणी आले आहे, याबाबतही शेतकऱ्यांकडून विचारणा होत आहे. यामुळे आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या स्थितीला किती टक्के पाणी आहे याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
अहमदनगरमधील धरणांचा पाणीसाठा
आढळा : आढळा या धरणात एकूण शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
भोजापुर : भोजापुर या धरणात एकूण शंभर टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिले आहे.
पिंप.जो : दक्षिणेकडील या धरणात 34.68% एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.
भंडारदरा : जिल्ह्याच्या उत्तरेकडे असणाऱ्या भंडारदरा धरणात एकूण दहा हजार 640 दलघफूट पाणी आहे म्हणजे या धरणात एकूण 96.39% एवढे पाणी आहे.
निळवंडे : उत्तरेकडील आणखी एक महत्त्वाचे धरण म्हणजे निळवंडे धरण. यामध्ये सध्या एकूण ७६५२ दलघफूट एवढे पाणी आहे. या धरणात एकूण ९१.९७ टक्के एवढे पाणी आहे.
मुळा : मुळा धरणात सध्या स्थितीला 88.23% एवढा एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे.
येडगाव : या धरणात 84.07% एवढा उपयुक्त पाण्याचा साठा आहे.
वडज : या धरणात 90% एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे.
सीना : या धरणात 30.96% एवढा एकूण पाणीसाठा शिल्लक आहे.
खैरी : या धरणात 72.18% एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.
विसापुर: या धरणात 78.85% एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.
माणिकडोह : या धरणात 53.02% एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे.
डिंभे : दक्षिणेकडील या धरणात एकूण 91.63% एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे.
घोड : दक्षिण भागातील या धरणात 85.11% एवढा एकूण पाणीसाठा आहे
मां.ओहोळ : या धरणात फक्त 7.47% एवढा एकूण पाणीसाठा आहे.
घा.पारगाव : या धरणात शून्य टक्के पाणी आहे.