अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्हा घरकुल उभारणीत राज्यात प्रथम, महाराष्ट्रात किती घरकुले?अहमदनगरमध्ये किती बांधली? पहा एक रिपोर्ट

Pradhan Mantri Awas Yojana : गरिबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्यात अमृत महाआवास अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. घरकुल उभारणीत अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर येत आहे.

या अभियानांतर्गत पहिल्या टप्यात संपूर्ण महाराष्ट्रात ८९ हजार ७६६ घरकुले बांधली गेली. त्यात २० हजार १४ घरकुले केवळ अहमदनगर जिल्ह्यात आहेत. अमृत महाआवास अभियान २० नोव्हेंबर २०२२ पासून हाती घेण्यात आलेले आहे.

या अभियानातून वर्षभरात तब्बल वीस हजाराहून अधिककुटुंबांना हक्काचे घर मिळाले आहे. आता दुसऱ्या टप्यात देखील अहमदनगर जिल्हा कौतुकास्पद कामगिरी करणार असून ६० हजार नवीन घरकुले उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

गृहसंकुलात देखील अहमदनगर जिल्हा अव्वल

महाआवास अभियानांतर्गत १५ हजार ३२१ तर राज्य पुरस्कृत योजनेतून ५ हजार ४२ घरकुले उभारली. या अभियानांतर्गत गृहसंकुल उभारण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. त्यात राज्यात २५ गृहसंकुल उभारण्यात आले आहेत. त्यातही सर्वाधिक १९ गृहसंकुले केवळ अहमदनगर जिल्ह्यातच आहेत.

२०१७ ते २०२३ अखेरपर्यंत ५४ हजार ९०० कुटुंबाना मिळाला हक्काचा निवारा

प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात २०१७ ते आज अखेर ५४ हजार ९०० घरकुले उभी राहिली आहेत. या सहा वर्षात राज्यात बांधलेल्या एकूण घरकुलांमध्ये अहमदनगर पाचव्या स्थानी आहे.

 सर्वाधिक घरकुले बांधणारे टॉप टेन जिल्हे
अहमदनगर : २० हजार ३६४
गोंदिया : १४ हजार ७०३
यवतमाळ : १४ हजार ३३०
नांदेड : १३ हजार ७३७
नाशिक : १३ हजार ३१
जळगाव : ११ हजार ८२०
अमरावती : ११ हजार ४१५
धुळे : १० हजार ४४७
चंद्रपूर : ९ हजार ४७२
छत्रपती संभाजीनगर : ८ हजार १४६

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts