Ahmednagar Division News : विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्र पक्षांना महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे. यामुळे आता विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. असे असतानाच गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असणारा अहमदनगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जिल्हा करायचा, या काही पारावरच्या गप्पा नाहीत…
तसेच अहमदनगर जिल्हा विभाजनावरून भारतीय जनता पक्षामध्ये दोन गट असल्याचेही उघड झाले आहे. खरंतर नुकत्याच दोन दिवसांपूर्वी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूर जिल्हा करायचा, जिल्हा करायचा, या काही पारावरच्या गप्पा नाहीत अशा शब्दात श्रीरामपूर जिल्हा मागणीवर आपली भूमिका स्पष्ट केली होती.
श्रीरामपूर जिल्हा बनवण्याची जबाबदारी !
मात्र माजी खासदारांच्या या वक्तव्यानंतर अवघ्या दोन दिवसात भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी श्रीरामपूर जिल्हा बनवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. ही जबाबदारी भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः आपल्या खांद्यावर घेतली आहे.
पुन्हा एकदा जिल्हा विभाजनाचा मुद्दा
त्यामुळे आता नगरच्या राजकारणात पुन्हा एकदा जिल्हा विभाजनाचा मुद्दा चर्चेस आला आहे. गिरीश महाजन यांनी भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. यावेळी त्यांनी श्रीरामपूर जिल्हा करण्याची जबाबदारी घेतली.
विशेष म्हणजे याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांचा समोर मांडणार असल्याचेही जाहीर केले. महाजन यांनी या कार्यक्रमात बोलताना असे म्हटले की “जिल्ह्यात विखे पाटील यांच्यासारखे मातब्बर मंत्री आहेत.
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणे ही काळाची गरज
तरी काही मागण्या माझ्याही कानावर येऊ द्या. भौगोलिक दृष्टिकोनातून अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणे ही काळाची गरज आहे. श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न करीन.” यामुळे श्रीरामपूर जिल्हा व्हावी अशी मागणी करणाऱ्या अनेकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
तर दुसरीकडे जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर बीजेपीमधील दोन नेते दोन टोकांची भूमिका घेत असल्याने बीजेपी मध्ये पुन्हा शीतयुद्ध सुरू होणार की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
हे पण वाचा : ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात कसा राहणार पाऊस ? कुठं पडणार मुसळधार ?
पंजाबराव डख यांचा तातडीचा मॅसेज ! पुन्हा एकदा महाराष्ट्रात बरसेल पाऊस…
ऑगस्ट महिन्यात खरंच पावसाचा खंड पडणार का ? पंजाबरावांनी स्पष्टचं सांगितलं
पंजाबरावांच मोठ भाकीत ! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात सूर्यदर्शन, पाऊस विश्रांती घेणार