Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीत सातत्याने भर पडताना दिसतेय. मारहाणीचे प्रकार वारंवार घडत आहेत. एका नामांकित डॉक्टरच्या रुग्णालयात घुसून तोडफोड व डॉक्टरसह त्याच्या कुटुंबियांना मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली. आता आणखी एक मोठी घटना समोर आली आहे.
अहमदनगरमधील एका मोठ्या उद्योगपतीस एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली असून ते पैसे न दिल्यास अन्यथा कुटुंब संपवणार असल्याची धमकी दिली आहे. हा उद्योजक पाथर्डी तालुक्यातील आहे. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी : तिसगाव येथील उद्योजक धीरज सदाशिव मैड यांनी सोमवारी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मैड हे तिसगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी व उद्योजक असून, त्यांचा सराफी व्यवसाय, पेट्रोल पंप व इतर उद्योग व्यवसाय आहेत.
मैड हे रविवारी (दि. ९) रोजी सकाळी तिसगाव येथील राहत्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एक अज्ञात व्यक्तिने हिंदी भाषेत धमकी दिली त्यानंतर मैड यांना पुन्हा ९.३० वाजता मोबाईल करून मैड यांना एक व्यक्तिने धमकी देऊन एक कोटीची मागणी केली.
त्यानंतर पुन्हा सोमवारी सकाळी पावणेनऊ वाजता (दि.१०) मोबाईल करुन एक कोटी रुपयाची मागणी केली. जर तुला तुझ्या कुटुंबाला जिवंत राहायचे असेल तर मला एक कोटी रुपये दे, नाही तर मी तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारुन टाकीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी पाथर्डी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
वाढती गुन्हेगारी चिंतेचे कारण
अहमदनगर जिल्ह्यातील वदाथी गुन्हेगारी हे चिंतेचे कारण बनले आहे. जिल्ह्यात घरफोडी,दरोडे अंडीघटना सातत्याने घडत असल्याचे दिसते. हे कमी की काय म्हणून टोळीयुद्ध, मारहाण , हाणामारी आदी घटना घडत आहेत. आता या खंडणी प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.