Ahmednagar News : अपघतांच्या मालिका सुरु असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यातून आणखी एक अपघाताचे वृत्त आले आहे. दुचाकीस्वार पती- पत्नी बहिणीकडे जागरण गोंधळाची पहाटेची आरती करून कामावर जात असताना पाठीमागून येणाऱ्या वाहनांची जोरात धडक बसल्याने दोघेही गंभीर जखमी झाले.
त्यांना तत्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले असता दुचाकी वरील पत्नीचा मृत्यू झाला तर पतीची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले आहे. हा अपघात राहुरी तालुक्यातील गुहा गाव नगर मनमाड रोडवर झाला.
गुहा येथे मेजर सोनवणे यांच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्याने भाऊ आपल्या बहिणीच्या घरी पत्नीसह आला होता. पहाटेची आरती झाल्यावर कामावर जाण्यासाठी येथून नगर मनमाड रोडने दुचाकी (एम एच १७ सी ५१६५) यावरून जात असताना माऊली डेअरी जवळ पाठीमागून येणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिली त्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले.
धडक देणारे वाहन अपघात होताच फरार झाले. रस्त्यावर पडलेल्या जखमींना उपचारासाठी वेळेवर कोणी मदत केली नाही तर तात्काळ जवळच असलेले हॉटेल मधील मालक ऋषिकेश कोळसे, शशी कोळसे, संजय पांढरे, राजू उर्हे, सतीश गायकवाड यांनी धाव घेत जखमी व बेशुद्ध अवस्थेत रवी देवकर यांच्या अॅम्बुलन्स मध्ये रुग्णालयात पाठवले.
दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने नगरला हलविले मात्र औषध उपचारापूर्वी मिराबाई केशव केदार वय वर्षे ५९ या महिलेचा मृत्यू झाला तर तिचे पती केशव मारुती केदार वय वर्ष ६५ यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले आहे. घटनेच्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी दाखल होऊन जखमींची विचारपूस करत पंचनामा केला.