अहमदनगरमध्ये कार व दुचाकीचा भीषण अपघात ! कार जळून खाक, तर दोघे…

Ahmednagar News : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मोपेडला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये मोपेडवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. १५ जुलै) संगमनेर तालुक्यातील खांडगाव परिसरात घडली. अपघातानंतर ही कार पेटलेल्या अवस्थेत शहर पोलिसांना आढळली.

अक्षय लक्ष्मण पवार (रा. रायतेवाडी) व धीरज गुंजाळ (रा. खांडगाव) असे जखमी तरुणांची नावे आहेत. अपघातानंतर कार चालक संकेत सुनील ढोले (रा. घोडेकर मळा) पसार झाला. कार पेटली की, कोणी पेटविली, याबाबत उलट- सुलट चर्चा सुरू आहे.

नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील खांडगाव शिवारात उड्डाण पुलाजवळून पुण्याहून संगमनेरच्या दिशेने भरधाव वेगाने (एम एच १४ एफ एक्स २७३६) या क्रमांकाची कार जात होती. कारचालकाने समोरून जाणाऱ्या मोपेडला (क्र. एमएच. १७, सीवाय. २११२) धडक दिली.

या मोपेडवर अक्षय लक्ष्मण पवार (रा. रायतेवाडी) आणि धीरज गुंजाळ (रा. खांडगाव) हे दोघे जात होते. या अपघातामध्ये हे दोघे जखमी झाले.

अपघातानंतर कार पलट्या घेऊन थेट उसाच्या शेतात जाऊन कोसळली. अपघातानंतर कारचालक सकेत सुनील ढोले (रा. घोडेकर मळा) हा कार सोडून पळून गेला. याबाबत मोपेडचालक

अक्षय पवार याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक संकेत ढोले याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले.

त्यांनी संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. त्यानंतर ही कार विझविण्यात आली. सोमवारी पहाटे कार पेटल्याचे पोलिसांना समजले. पोलिस उप निरीक्षक विश्वास भानसी पथकासह घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी संगमनेर नगरपालिका अग्निशमक दलास पाचारण केले. कार विझविण्यात आली, मात्र या अपघाताबाबत संभ्रम व्यक्त केला जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts