अहमदनगर बातम्या

शेती धरणात गेली..वडील टेम्पो चालवतात.. याच अहमदनगरमधील टेम्पोचालकाची मुलगी बनली पोलीस अधिकारी

Ahmednagar News : परिश्रम करण्याची ताकद असेल, जिद्द असेल तर माणूस कोठेही यश मिळवतो. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे अशी एक म्हण आपल्याकडे आहे. आज हेच सर्व ब्रिदवाक्ये अहमदनगरच्या लेकीने सार्थकी केली आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवत एका टेम्पो चालकाची मुलगी पोलीस उपनिरीक्षक बनली आहे. काजल आग्रे असे या टेम्पो चालकाच्या मुलीचे नाव आहे.

जिद्द आणि परिश्रम घेण्याची तयारी असली की, कठीण परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालता येते. अशीच राहुरी तालुक्यातील म्हैसगाव (आग्रेवाडी) येथील काजल मच्छिंद्र आग्रे हिने अतिशय खडतर प्रयत्नातून पोलीस उपनिरीक्षक पद मिळविले.

विशेष तिची घरची परिस्थिती बेताची असून शेती मुळा धरणात संपादित झाल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वडील टेम्पो चालवतात.

मुळा नदीच्या पायथ्याशी असलेल्या म्हैसगाव (आग्रेवाडी) मध्ये काजलचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला, वडील मच्छिंद्र आग्रे. शेती मुळा धरणात संपादित झाल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वडील टेम्पो चालवत संसाराचा गाडा हाकत आहे,

तर आई घर सांभाळत मुलीच्या शिक्षणाला हात भार लावत होती. काजल ही लहानपणापासून हुशार, जिद्दी, अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्तीची मुलगी असून गावात मुलींमध्ये प्रथम महिला पीएसआय होण्याचा मान तिने मिळविला आहे.

काजलचे प्राथमिक शिक्षण आग्रेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण म्हैसगाव येथील श्री. केदारेश्वर माध्यमिक विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय सात्रळ आणि पद्मश्री विखे पाटील कॉलेज प्रवरानगर येथे झाले.

त्यानंतर स्पर्धा परिक्षेत २०१९ ला पहिला प्रयत्न केला. त्यात यश मिळाले नाही. त्यानंतर २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करुन पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परिक्षेत उत्तीर्ण झाली.

काजलच्या आग्रेवाडी, यशाबद्दल म्हैसगाव ग्रामस्थांसह राहुरी तालुक्यातील विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts