Ahmednagar News : लाकडी दांडे, रॉड, पाईपने हल्ला करत तिघा जणांचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना अहमदनगर शहरात घडली.
वाहन व पैशाच्या व्यवहारातून हा राडा झाला असल्याचे बोलले जात आहे. ही हाणामारीची घटना रेल्वे स्टेशन गेट समोर घडली.
प्रकाश राजू लोखंडे, चंद्रकांत अशोक सातपुते, अमोल किशोर खोमणे हे तिघे यामध्ये जखमी झाल्याची माहिती समजली आहे. चंद्रकांत अशोक सातपुते यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात नऊ ते दहा जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह अन्य कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय.
गुरूवारी (११ जुलै) रात्री चंद्रकांत सातपुते व त्यांचे साथीदार रेल्वे स्टेशन गेट परिसरातील एका हॉटेलजवळ आले होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले.
त्यांच्यात वाहन व पैशाच्या व्यवहारातून बाचाबाची झाली व त्यातूनच त्यांनी लाकडी दांडे, रॉड, पाईपने हल्ला करत तिघा जणांवर हल्ला केला असे फिर्यादीत म्हटले आहे.
एकमेकांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी
एकमेकांच्या ओळखीचे असलेल्या वकील व एका व्यक्तीने फोनवरून एकमेकांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अॅड. हर्षद मनोज चावला (वय २८ रा. मिस्कीननगर, सावेडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून असद गफार शेख (रा. मुकुंदनगर) याच्याविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड. चावला यांनी तक्रारीत म्हटले आहे की,
१३ जुलै रोजी रात्री १:३७ वाजता मित्र बग्गा (पूर्ण नाव, पत्ता नाही) सोबत तारकपूर बस स्थानक येथे असताना असद शेख याने बग्गाच्या मोबाईलवर फोन करून शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी मी माझ्या मोबाईलवरून मोबाईलवर त्याच्या केला फोन असता त्याने पुन्हा शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
असद गफार शेख (रा. मुकुंदनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अॅड. हर्षद मनोज चावला (रा. मिस्कीनगर, सावेडी) याच्याविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असद शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे की,
१३ जुलै रोजी रात्री सव्वा बाराच्या सुमारास चावला याने त्याच्याकडील मोबाईल नंबरवरून माझ्या मोबाईल नंबरवर फोन करून विनाकारण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.