अहमदनगर बातम्या

अहमदनगरमध्ये शेअर मार्केट फसवणुकीचा हौदोस ! सहा महिन्यांत करोडो हडपले

Ahmednagar News : शेअर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचे शेअर्स खरेदी करून देतो, जास्त लाभ देतो अशा पद्धतीचे आमिष देऊन अहमदनगर जिल्ह्यात शेकडो लोकांची फसवणूक झाली आहे. कोट्यवधी रुपये लुटले गेले आहेत.

यातील काही बहाद्दर फरार झाले आहेत. आता आणखी काही प्रकरणे समोर आली असून सहा महिन्यांत आठ जणांना ३ कोटींना चुना लावला आहे. यापूर्वीचे सात गुन्हे दाखल आहेत. गेल्या सहा महिन्यांत शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक केल्याचे सात गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात

दाखल असून, २ कोटी ८१ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. नफा मिळाला नाहीच, पण मुद्दलही परत मिळाली नाही. अशा गुन्ह्यांचा तपासही लागत नाही. तपास लागेपर्यंत संबंधितांचे खाते रिकामे झालेले असते. त्यामुळे फसवणुकीची रक्कम परत मिळणे कठीण झाले आहे.

शेवगावात पुन्हा एक प्रकरण समोर आले आहे. शेअर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचे शेअर्स खरेदी करून देतो, असे सांगून सहा जणांची ४५ लाख ९ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत कृष्णा बाजीराव भागवत (वय ३८) यांच्या फिर्यादीवरून कैलास दत्तात्रय भागवत ता. शेवगाव) (रा. एरंडगाव) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेवगावमध्ये कोट्यवधींची फसवणूक
शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत आतापर्यंत १० जणांनी फिर्याद दिली आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात १५ ते २० कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाली,

परंतु, तक्रार दिली नाही, असेही अनेकजण आहेत. शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक करणारे मोठे रॅकेट शेवगाव तालुक्यात सक्रिय आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा मोठा असू शकतो, असे सांगण्यात आले

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts