अहमदनगर बातम्या

हेल्मेटने मारहाण अन हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू.. पोलीस कर्मचाऱ्यासोबत धक्कादायक घडलं..

Ahmednagar News : सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी सुखदेव गर्जे यांचा तीन चार दिवसांपूर्वी शिंगणापूर फाटा येथे मृत्यू झाला होता. या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू केलेल्या मारहाणीमुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने झाला.

त्यामुळे राहुरी कृषी विद्यापीठातील मायलेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी : २२ ऑगस्ट रोजी राहुरी-शिंगणापूर फाट्याजवळ सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी सुखदेव गर्जे यांचा मारहाणीत मृत्यू झाला होता.

याप्रकरणी आरोपी सावित्री ऊर्फ शोभा विष्णू फुंदे व तिचा मुलगा वैभव विष्णु फुंदे, दोघे रा. राहुरी कृषी विद्यापीठ या माय-लेकांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटनेतील मृत सुखदेव किसनराव गर्जे, वय ६८, रा. खंडोबा नगर, शेवगाव यांचे आरोपी सोबत पूर्वीचे वाद सुरू होते.

पाथर्डी पोलिस स्टेशनला ३०७ चा गुन्हा दाखल असल्याचा राग आरोपींच्या मनामध्ये होता. २२ ऑगस्टला दुपारी तीन वाजे दरम्यान सुखदेव गर्जे हे कामानिमित्त राहुरी येथे आले असताना राहुरी-शनिशिंगणापूर फाटा येथे आरोपी माय-लेकाने सुखदेव गर्जे यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती.

पोलिसांनी गर्जे यांच्यासमवेत असलेल्या सावित्री उर्फ शोभा विष्णू फुंदे व तिचा मुलगा वैभव विष्णु फुंदे (दोघे रा. राहुरी विद्यापीठ) यांना ताब्यात घेतले होते. सुखदेव गर्जे यांचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला असून सुखदेव गर्जे यांचा मृत्यू हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र आरोपींनी केलेल्या मारहाणीमुळेच गर्जे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याने

मृत गर्जे यांचा मुलगा किशोर सुखदेव गर्जे (वय ३४, रा. खंडोबा नगर, शेवगाव) याच्या फिर्यादीवरून आरोपी फुंदे मायलेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्वीच्या रागातून शिंगणापूर फाटा येथे फंदे मायलेकाने गर्जे यांना शिवीगाळ करून गर्जे यांना हृदयाचा त्रास आहे आणि त्यांची यापूर्वी अॅजोप्लास्टी झालेली आहे. असे माहीत असूनदेखील हेल्मेटने मारहाण केली असा आरोप केला जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts